वीणाताई, मराठी वाचकांचा आपल्या लेखणीवर अलोट व अजोड विश्वास आहे!
कोणी कृषितज्ज्ञ, कोणी अणुशास्त्रज्ञ, तर कोणी दीनदलितांचे सेवक, कोणी राजकारणी, तर कोणी पक्षी वा सर्प सांभाळण्यासाठी आयुष्य वेचलेले, कोणी चित्रकार, तर कोणी पाण्याचे महत्त्व ओळखलेले द्रष्टे आणि असे आणखीही लोकसेवक... यांतल्या अनेकांची अवस्था निदान आम्हा मराठी वाचकांसाठी तरी ‘नाही चिरा नाही पणती...’ अशीच राहिली असती, जर आपल्या वेधक नजरेचा आणि रत्नपारखी लेखणीचा जादुई स्पर्श त्यांना झाला नसता! .......